करतोय भेट जे पण संसार घेउनी बघ

 करतोय भेट जे पण संसार घेउनी बघ
अपमान घेउनी बघ सत्कार घेउनी बघ
 
मागे सरून चित्ता घेतोय झेप दुप्पट
अनिवार्य वाटते तर माघार घेउनी बघ
 
ब्रह्मांड आहे सिंधू तू मात्र एक बिंदु
विश्वास जर नसेल तर विस्तार घेउनी बघ
 
बाजार या जगाला आजार देऊ शकतो
सामर्थ्य पाहिजे तर संस्कार घेउनी बघ
 
पंडित सदाशिवाचे जी काळजात घुसली
छातीवरी कधी ती कट्यार घेउनी बघ

No comments:

Post a Comment