आत्मघाताला स्वत: भेटू कशाला
धावत्या रस्त्यात मी थांबू
कशाला
दृश्य आणि दृष्टिची तकरार
नाही
व्यर्थ, मी सूर्याकडे पाहू कशाला
ज्या कथेचा 'क' मला माहीत नाही
त्या कहाणीवर फुकट बोलू कशाला
जूनी गाणी अप्रतिम होती
तरीही
तीच गाणी नेहमी ऐकू कशाला
दु:ख माझे फक्त खरचटण्याबरोबर
"एवढेसे दु:ख मी सजवू कशाला"
व्यर्थ, मी सूर्याकडे पाहू कशाला
त्या कहाणीवर फुकट बोलू कशाला
तीच गाणी नेहमी ऐकू कशाला
"एवढेसे दु:ख मी सजवू कशाला"
No comments:
Post a Comment