दर्शन अजूनही, हे, ताजातरीन आहे

 दर्शन अजूनही, हे, ताजातरीन आहे
माणूस अधीन होता माणूस अधीन आहे
 
श्रद्धा धरून, श्रद्धेवरती सवाल करणं
प्राचीन दर्शनावर, दृष्टी नवीन आहे
 
रोबोट यान घेऊन चंद्रावरी पोहोचलो
बघुनी तिथून म्हणतो, माणूस मशीन आहे
 
इतकं गुणी तरीही इतकी विनम्र चर्चा
संदर्भ जे असो ते, माणूस कुलीन आहे
 
हुद्दा पियूनचा अन मॅनेजराचं वेतन
करणार काय आपण, ती नाजनीन आहे

No comments:

Post a Comment