पीडा बघून ज्याच्या हृदयात खंत नाही

 पीडा बघून ज्याच्या हृदयात खंत नाही
मोठी किती असो पण ती व्यक्ति संत नाही
 
धन लाभले परंतू मन लाभले न ज्याला
तो भाग्यवंत आहे सौभाग्यवंत नाही

होती ती एक रात्री हातात हात होते

 होती ती एक रात्री हातात हात होते
सगळे तुझे खेळाडू माझ्या गटात होते
 
भरलेले आहे चक्क अल्बममधे मनाच्या
माझे तुझे हसू जे त्या आरशात होते

जयकार मुंबईचा सत्कार मुंबईचा

 जयकार मुंबईचा सत्कार मुंबईचा
सर्वांना देते संधी आभार मुंबईचा
 
ज्यांचे खिसे रिकामे, त्यांची तिजोरि भरली
लक्ष्मीस्वरूप आहे अवतार मुंबईचा

बोल कधी येणार तू मित्रा, मला तुला भेटायचे आहे

बोल कधी येणार तू मित्रा, मला तुला भेटायचे आहे
हृदयावर जे डाग लागले, मिळून ते पुसायचे आहे
 
कळत नकळत कितीतरी आठवणी आपण हरवत गेलो
आठवणींना आठवणींशी भेटूनी बोलायचे आहे

मला सांगायचे होते निवळ खोटारडी आहे

 मला सांगायचे होते निवळ खोटारडी आहे
परंतू मन म्हणत आहे, खरी तर जिंदगी आहे
 
सुखाचा एक क्षण देखील मला तर लाभला नाही
दुःखी होऊ नको आरोप हा माझ्यावरी आहे

नुसतं टाईमपास करत बसलो आहे

 नुसतं टाईमपास करत बसलो आहे
तासांपासून वाट बघत बसलो आहे
 
आठवते का तू जो शब्द दिला होतास
आठवून तो परत परत बसलो आहे

मित्रा तुझ्या मनाला मोठं करून बघ तू

 मित्रा तुझ्या मनाला मोठा करून बघ तू
कल्याण पाहिजे तर करुणा करून बघ तू
 
मी सांगतोय त्यावर, देऊ न लक्ष अगदी
पैसे भले की प्रीती, तुलना करून बघ तू

क्षणही जगू न शकले मरण्याची वेळ आली

 क्षणही जगू न शकले मरण्याची वेळ आली
हसणार होते किंतू रडण्याची वेळ आली
 
बेमौसमी ढगांनो. का माहिती तुम्हाला
प्रारब्धसाठी पुन्हा, फिरण्याची वेळ आली

प्रेमास हात धरुनी पसरून गेली वाणी

प्रेमास हात धरुनी पसरून गेली वाणी
रंगात ह्या जगाच्या रंगून गेली वाणी
 
ध्वनि, धूर, स्पर्श, गंध, मुद्रा, प्रतीकचिन्हे
शब्दात व्यक्त करुनी, बहरून गेली वाणी

दर्शन अजूनही, हे, ताजातरीन आहे

 दर्शन अजूनही, हे, ताजातरीन आहे
माणूस अधीन होता माणूस अधीन आहे
 
श्रद्धा धरून, श्रद्धेवरती सवाल करणं
प्राचीन दर्शनावर, दृष्टी नवीन आहे

खरं सांगतोय माझं जीवन कमाल आहे

 खरं सांगतोय माझं जीवन कमाल आहे
शमशीर नाव माझं, अन मीच ढाल आहे
 
मी धान्य, मीच गिरणी, दळणारा, जेवणारा,
मी बेमिसाल आहे! मी बेमिसाल आहे!

मातीची माती करून तू काय घडवलं सांग मला

 मातीची माती करून तू काय घडवलं सांग मला
तुझ्या मनाचं करून मित्रा काय मिळवलं सांग मला
 
झालं काय तुला हो मित्रा, सदा राहतो आजारी
गिरणीमध्ये धान्या सकट तू काय दळवलं सांग मला

आत्मघाताला स्वत: भेटू कशाला

 आत्मघाताला स्वतभेटू कशाला
धावत्या रस्त्यात मी थांबू कशाला
 
दृश्य आणि दृष्टिची तकरार नाही
व्यर्थमी सूर्याकडे पाहू कशाला

लालसा म्हणतात ज्याला त्या भुकेचा अंत कर

 लालसा म्हणतात ज्याला त्या भुकेचा अंत कर
अंत नाही केलं तर होईल तमाशा अंत कर
 
अंत कर प्यारे निरर्थक बातम्यांचा अंत कर
तू खरा, तूही खरा चिडतो कशाला अंत कर

दायित्वाचे भान हवे

 दायित्वाचे भान हवे
ज्ञान नको संज्ञान हवे
 
इतकी सुस्ती नाय बरी
लाटांना तूफान हवे

करतोय भेट जे पण संसार घेउनी बघ

 करतोय भेट जे पण संसार घेउनी बघ
अपमान घेउनी बघ सत्कार घेउनी बघ
 
मागे सरून चित्ता घेतोय झेप दुप्पट
अनिवार्य वाटते तर माघार घेउनी बघ

भीतोय जग भिऊ दे आपण जिगर करू या

 भीतोय जग भिऊ दे आपण जिगर करू या
अंधार आहे जोवर तोवर सफर करू या
 
हे सूर्य चंद्र तारे दृष्टीसमोर आहेत
ज्यावर नजर न आहे त्यावर नजर करू या

इजहारची भलेही रफ्तार मंद आहे

 इजहारची भलेही रफ्तार मंद आहे
खरं सांगतो मला बस प्रेमात छंद आहे
 
उर्दू तुला समजते उर्दूत सांगतो मी
बस तू पसंद होती बस तू पसंद आहे

हो मी उचलतो पर्वत आधार दे मला तू

 हो मी उचलतो पर्वत आधार दे मला तू
लाजू नकोस मित्रा होकार दे मला तू
 
जे स्वप्न पाहिले तू होणार पूर्ण सगळे
साकार करण्यासाठी अधिकार दे मला तू

ज्याला अखंड माझ्या स्वप्नात पाहतो मी

 ज्याला अखंड माझ्या स्वप्नात पाहतो मी
आल्या समोर त्याला सहसा नाकारतो मी
 
एकच सवाल माझा, कोठे गं राहतो तू
एकच जवाब त्याचा, हृदयात राहतो मी

परिचय – नवीन सी. चतुर्वेदी

              संक्षिप्त परिचय – नवीन सी. चतुर्वेदी
(ब्रजगजल प्रवर्तक, बहुभाषी शायर (कवि) एवं व्यंग्यकार)