होती ती एक रात्री हातात हात होते
सगळे तुझे खेळाडू माझ्या
गटात होते
भरलेले आहे चक्क अल्बममधे
मनाच्या
माझे तुझे हसू जे त्या आरशात होते
वळवून डोळे बसलो ती वेळ नाही
आली
स्वप्नांचे काय स्वप्न बस येत जात होते
अश्रूंचा पूर आला वाहून गेली
प्रीती
आश्वासनांच्या जागी संशय मनात होते
हो जाणतो तरीही मी बोलणार
नाही
माझ्या गळ्यावरी ते कोणाचे हात होते
माझे तुझे हसू जे त्या आरशात होते
स्वप्नांचे काय स्वप्न बस येत जात होते
आश्वासनांच्या जागी संशय मनात होते
माझ्या गळ्यावरी ते कोणाचे हात होते
No comments:
Post a Comment