हो मी उचलतो पर्वत आधार दे मला तू
लाजू नकोस मित्रा होकार दे
मला तू
जे स्वप्न पाहिले तू होणार
पूर्ण सगळे
साकार करण्यासाठी अधिकार दे मला तू
तुज सोबती मला बस जगण्यात
छंद आहे
जे पाहिजे तुला ते अवतार दे मला तू
कैलास माझे घर मी गोपाळ गोकुळाचा
जलधार दे मला तू रसधार दे मला तू
दे कष्ट तू कितीही इतकी
विनंती आहे
दुःखसोबती सुखाही चिक्कार दे मला तू
साकार करण्यासाठी अधिकार दे मला तू
जे पाहिजे तुला ते अवतार दे मला तू
जलधार दे मला तू रसधार दे मला तू
दुःखसोबती सुखाही चिक्कार दे मला तू
No comments:
Post a Comment