मित्रा तुझ्या मनाला मोठा करून बघ तू
कल्याण पाहिजे तर करुणा करून
बघ तू
मी सांगतोय त्यावर, देऊ न
लक्ष अगदी
पैसे भले की प्रीती, तुलना करून बघ तू
अल्लाह सोड, सल्ला
देखील नाय मिळणार
प्रेमाच्या पंथ सोडून, ईर्ष्या करून बघ तू
मिळणार मात्र काही, जाणार
खूप काही
अनुभव तुला हवे तर हल्ला करून बघ तू
जग जे म्हणे,
म्हणू दे, तू लक्ष दे न त्यावर
देणार देव दर्शन, इच्छा करून बघ तू
पैसे भले की प्रीती, तुलना करून बघ तू
प्रेमाच्या पंथ सोडून, ईर्ष्या करून बघ तू
अनुभव तुला हवे तर हल्ला करून बघ तू
देणार देव दर्शन, इच्छा करून बघ तू
No comments:
Post a Comment