जयकार मुंबईचा सत्कार मुंबईचा

 जयकार मुंबईचा सत्कार मुंबईचा
सर्वांना देते संधी आभार मुंबईचा
 
ज्यांचे खिसे रिकामे, त्यांची तिजोरि भरली
लक्ष्मीस्वरूप आहे अवतार मुंबईचा
 
अस्तित्व आहे ह्याचा थेंबापरी भलेही
पण औक्षवंत आहे विस्तार मुंबईचा
 
रंगात रंगला जो माणुस, मलंग झाला
सर्वांग स्वस्थ करतो आजार मुंबईचा
 
जो पाहिजे तुम्हाला तो पाहिजे मलाही
इतकाच मात्र आहे उद्गार मुंबईचा
 
बस, ट्रेन थांबते अन् रस्ताही सुस्त पडतो
पण बंद होत नाही बाजार मुंबईचा

No comments:

Post a Comment