मातीची माती करून तू काय घडवलं
सांग मला
तुझ्या मनाचं करून मित्रा
काय मिळवलं सांग मला
झालं काय तुला हो मित्रा, सदा राहतो आजारी
गिरणीमध्ये धान्या सकट तू काय दळवलं सांग मला
गादीवरती बसलो आहे अवतीभवती
इंद्र-कुबेर
तरी शांतता नाही तुला रे काय हरवलं सांग मला
कधी वाटते पुतळा आहे कधी
यंत्र अन कधी पशू
देवसारख्या जीवाला तू काय बनवलं सांग मला
या जगात नाही अन पुढच्या
जगातही नाही मिळणार
दिवसरात्र जपुनी जपुनी तू काय जमवलं सांग मला
गिरणीमध्ये धान्या सकट तू काय दळवलं सांग मला
तरी शांतता नाही तुला रे काय हरवलं सांग मला
देवसारख्या जीवाला तू काय बनवलं सांग मला
दिवसरात्र जपुनी जपुनी तू काय जमवलं सांग मला
No comments:
Post a Comment