ज्याला अखंड माझ्या स्वप्नात
पाहतो मी
आल्या समोर त्याला सहसा
नाकारतो मी
एकच सवाल माझा, कोठे
गं राहतो तू
एकच जवाब त्याचा, हृदयात राहतो मी
पुढचा सवाल माझा, तू
काय शोधतो गं
डोळे मिटून म्हणालो अनुराग शोधतो मी
त्याला विचारले मी वाटप कशास
करतो
शून्यात घोष झाला सामर्थ्य वाटतो मी
हरतोस केव्हा केव्हा, ह्या
प्रश्नावर म्हणाला
तू जिंकतोस जेव्हा, तेव्हाच हारतो मी
एकच जवाब त्याचा, हृदयात राहतो मी
डोळे मिटून म्हणालो अनुराग शोधतो मी
शून्यात घोष झाला सामर्थ्य वाटतो मी
तू जिंकतोस जेव्हा, तेव्हाच हारतो मी
No comments:
Post a Comment