दायित्वाचे भान हवे
ज्ञान नको संज्ञान हवे
इतकी सुस्ती नाय बरी
लाटांना तूफान हवे
म्हणू कुबेर कुणाला मी
सगळ्यांनाही दान हवे
खुर्ची हवी मला देखील
खुर्चीला सुलतान हवे
झाड नको ह्या दुनियेला
फक्त पुष्प अन पान हवे
अहो ढगांनो दया करा
शेतकऱ्यांना धान हवे
लाटांना तूफान हवे
सगळ्यांनाही दान हवे
खुर्चीला सुलतान हवे
फक्त पुष्प अन पान हवे
शेतकऱ्यांना धान हवे
No comments:
Post a Comment