खरं सांगतोय माझं जीवन कमाल आहे

 खरं सांगतोय माझं जीवन कमाल आहे
शमशीर नाव माझं, अन मीच ढाल आहे
 
मी धान्य, मीच गिरणी, दळणारा, जेवणारा,
मी बेमिसाल आहे! मी बेमिसाल आहे!
 
जे आहे ते नकोसा, जे नाही ते हवेसा
दुनियेचा प्रश्न नाही, माझा सवाल आहे
 
मी ओढणीला धोतर म्हणतोय आणि केव्हा
नऊवारी माझ्यासाठी नुसतं रुमाल आहे
 
ओठांवरी हसू पण चिंता सदा मनाला
का मी खुशालचेंडू नक्की खुशाल आहे ?

No comments:

Post a Comment