मला सांगायचे होते निवळ खोटारडी आहे

 मला सांगायचे होते निवळ खोटारडी आहे
परंतू मन म्हणत आहे, खरी तर जिंदगी आहे
 
सुखाचा एक क्षण देखील मला तर लाभला नाही
दुःखी होऊ नको आरोप हा माझ्यावरी आहे
 
असो किंवा नसो, पण चांगले संदेश ठेवूया
कुणाची नाही रे ही आपली कादंबरी आहे
 
रडत बसलाय का तू, जलप्रलय माहीत नाही का
इथं सगळ्यांकडे आपापली गोदावरी आहे
 
निरागस चेहरेवर मात्र प्रेमळ भाव राहू दे
अगं रागू नको तू जीवनाची रागिणी आहे

No comments:

Post a Comment