पीडा बघून ज्याच्या हृदयात खंत नाही
मोठी किती असो पण ती व्यक्ति
संत नाही
धन लाभले परंतू मन लाभले न
ज्याला
तो भाग्यवंत आहे सौभाग्यवंत नाही
जग राहणार जोवर ही राहणार
तोवर
दु:खाचा अंत आहे चिंतेचा अंत नाही
कसले हे बुद्धिजीवी कसली ही
मानसिकता
ब्यूटी पसंत आहे ड्यूटी पसंत नाही
प्राचीन वैद्यकीच्या उपचार
वेळ घेतो
कांदा तुरंत होतो आंबा तुरंत नाही
तो भाग्यवंत आहे सौभाग्यवंत नाही
दु:खाचा अंत आहे चिंतेचा अंत नाही
ब्यूटी पसंत आहे ड्यूटी पसंत नाही
कांदा तुरंत होतो आंबा तुरंत नाही
No comments:
Post a Comment