क्षणही जगू न शकले मरण्याची
वेळ आली
हसणार होते किंतू रडण्याची
वेळ आली
बेमौसमी ढगांनो. का माहिती तुम्हाला
प्रारब्धसाठी पुन्हा, फिरण्याची वेळ आली
भूमी, भवन, जलावर, आधीच
टॅक्स होते
कर, वायूवरही आता, भरण्याची वेळ आली
तुमचे हे बोलबच्चन, तुमच्या
खिशात ठेवा
जमिनीवरी करामत, करण्याची वेळ आली
आव्हान द्या मुलींनो, कंबर
कसा मुलांनो
हातात सूत्र आता धरण्याची वेळ आली
प्रारब्धसाठी पुन्हा, फिरण्याची वेळ आली
कर, वायूवरही आता, भरण्याची वेळ आली
जमिनीवरी करामत, करण्याची वेळ आली
हातात सूत्र आता धरण्याची वेळ आली
No comments:
Post a Comment