जयकार मुंबईचा सत्कार मुंबईचा

 जयकार मुंबईचा सत्कार मुंबईचा
सर्वांना देते संधी आभार मुंबईचा
 
ज्यांचे खिसे रिकामे, त्यांची तिजोरि भरली
लक्ष्मीस्वरूप आहे अवतार मुंबईचा

पीडा बघून ज्याच्या हृदयात खंत नाही

 पीडा बघून ज्याच्या हृदयात खंत नाही
मोठी किती असो पण ती व्यक्ति संत नाही
 
धन लाभले परंतू मन लाभले न ज्याला
तो भाग्यवंत आहे सौभाग्यवंत नाही

होती ती एक रात्री हातात हात होते

 होती ती एक रात्री हातात हात होते
सगळे तुझे खेळाडू माझ्या गटात होते
 
भरलेले आहे चक्क अल्बममधे मनाच्या
माझे तुझे हसू जे त्या आरशात होते

आत्मघाताला स्वत: भेटू कशाला

 आत्मघाताला स्वतभेटू कशाला
धावत्या रस्त्यात मी थांबू कशाला
 
दृश्य आणि दृष्टिची तकरार नाही
व्यर्थमी सूर्याकडे पाहू कशाला

लालसा म्हणतात ज्याला त्या भुकेचा अंत कर

 लालसा म्हणतात ज्याला त्या भुकेचा अंत कर
अंत नाही केलं तर होईल तमाशा अंत कर
 
अंत कर प्यारे निरर्थक बातम्यांचा अंत कर
तू खरा, तूही खरा चिडतो कशाला अंत कर

दायित्वाचे भान हवे

 दायित्वाचे भान हवे
ज्ञान नको संज्ञान हवे
 
इतकी सुस्ती नाय बरी
लाटांना तूफान हवे

करतोय भेट जे पण संसार घेउनी बघ

 करतोय भेट जे पण संसार घेउनी बघ
अपमान घेउनी बघ सत्कार घेउनी बघ
 
मागे सरून चित्ता घेतोय झेप दुप्पट
अनिवार्य वाटते तर माघार घेउनी बघ

भीतोय जग भिऊ दे आपण जिगर करू या

 भीतोय जग भिऊ दे आपण जिगर करू या
अंधार आहे जोवर तोवर सफर करू या
 
हे सूर्य चंद्र तारे दृष्टीसमोर आहेत
ज्यावर नजर न आहे त्यावर नजर करू या

इजहारची भलेही रफ्तार मंद आहे

 इजहारची भलेही रफ्तार मंद आहे
खरं सांगतो मला बस प्रेमात छंद आहे
 
उर्दू तुला समजते उर्दूत सांगतो मी
बस तू पसंद होती बस तू पसंद आहे

हो मी उचलतो पर्वत आधार दे मला तू

 हो मी उचलतो पर्वत आधार दे मला तू
लाजू नकोस मित्रा होकार दे मला तू
 
जे स्वप्न पाहिले तू होणार पूर्ण सगळे
साकार करण्यासाठी अधिकार दे मला तू

ज्याला अखंड माझ्या स्वप्नात पाहतो मी

 ज्याला अखंड माझ्या स्वप्नात पाहतो मी
आल्या समोर त्याला सहसा नाकारतो मी
 
एकच सवाल माझा, कोठे गं राहतो तू
एकच जवाब त्याचा, हृदयात राहतो मी

परिचय – नवीन सी. चतुर्वेदी

              संक्षिप्त परिचय – नवीन सी. चतुर्वेदी
(ब्रजगजल प्रवर्तक, बहुभाषी शायर (कवि) एवं व्यंग्यकार)