इजहारची भलेही रफ्तार मंद आहे
खरं सांगतो मला बस प्रेमात
छंद आहे
उर्दू तुला समजते उर्दूत
सांगतो मी
बस तू पसंद होती बस तू पसंद आहे
चिंता करून मित्रा होणार काय
नाही
येऊन पुढे उघड ते जे दार बंद आहे
प्रेमाच्या वैखरीचा सारांश
मात्र इतकं
हे भेटलं न ज्याला बस त्याला द्वंद आहे
जर माणसाशी नाही देवाशी
प्रेम कर तू
बस प्रेम प्रेम प्रेमच आनंदकंद आहे
बस तू पसंद होती बस तू पसंद आहे
येऊन पुढे उघड ते जे दार बंद आहे
हे भेटलं न ज्याला बस त्याला द्वंद आहे
बस प्रेम प्रेम प्रेमच आनंदकंद आहे
No comments:
Post a Comment