बोल कधी येणार तू मित्रा, मला तुला भेटायचे आहे

बोल कधी येणार तू मित्रा, मला तुला भेटायचे आहे
हृदयावर जे डाग लागले, मिळून ते पुसायचे आहे
 
कळत नकळत कितीतरी आठवणी आपण हरवत गेलो
आठवणींना आठवणींशी भेटूनी बोलायचे आहे
 
गायले होते दोघांनी जे, गुलशनगुलशन, साहिलसाहिल,
खरं सांगतो, तुझ्यासोबती, गीत पुन्हा ते गायचे आहे
 
परत परत अन जिथेतिथे जे शब्द आलेले ओठांवरती
पुन्हा तेच बोलायचे आहे, पुन्हा तेच ऐकायचे आहे
 
वेळ नको वाया कर मित्रा, अनुकंपा कर, लवकर ये रे

तुझा चेहरा बघून, माझ्या घरी, मला परतायचे आहे 

No comments:

Post a Comment