प्रेमास हात धरुनी पसरून गेली वाणी

प्रेमास हात धरुनी पसरून गेली वाणी
रंगात ह्या जगाच्या रंगून गेली वाणी
 
ध्वनि, धूर, स्पर्श, गंध, मुद्रा, प्रतीकचिन्हे
शब्दात व्यक्त करुनी, बहरून गेली वाणी
 
दहशत मनात नव्हती, कल्याण हेतु होता
काही निमित्तासाठी, झाकून गेली वाणी
 
बोलत राहा निरंतर, ऐकत राहा निरंतर
निर्जीव झाले, ज्यांना, सोडून गेली वाणी
 
बोला परंतु मित्रा, करुनी विचार बोला
घडल्या अशाही घटना, फसवून गेली वाणी

No comments:

Post a Comment