लालसा म्हणतात ज्याला त्या भुकेचा अंत कर

 लालसा म्हणतात ज्याला त्या भुकेचा अंत कर
अंत नाही केलं तर होईल तमाशा अंत कर
 
अंत कर प्यारे निरर्थक बातम्यांचा अंत कर
तू खरा, तूही खरा चिडतो कशाला अंत कर
 
डोळे मिटवून दूध पीणाऱ्या तुझे डोळे उघड
पाहिजे ते पी तुला जे पाहिजे खा अंत कर
 
वाटते आहे तुला जर अंत केलंच पाहिजे
वेदनांचा अंत नाही वेदनांचा अंत कर
 
सोडुनी किंतू परंतू ये घराबाहेर ये
खूप झाले डिस्कशन आरंभ किंवा अंत कर

No comments:

Post a Comment