भीतोय जग भिऊ दे आपण जिगर करू या
अंधार आहे जोवर तोवर सफर करू
या
हे सूर्य चंद्र तारे दृष्टीसमोर आहेत
ज्यावर नजर न आहे त्यावर नजर करू या
आहे गरज परंतू जे काम होत
नाही
सातत्य काम आपण ते जन्मभर करू या
अस्तित्व नाही ह्याचे
आकर्षतोय मात्र
या मृगजळाला मित्रा चल बेअसर करू या
बिंदू ढगाशी खाली पडतो नि
सिंधू बनतो
आहे कठीण जीवन सोईस्कर करू या
ज्यावर नजर न आहे त्यावर नजर करू या
सातत्य काम आपण ते जन्मभर करू या
या मृगजळाला मित्रा चल बेअसर करू या
आहे कठीण जीवन सोईस्कर करू या
No comments:
Post a Comment