नुसतं टाईमपास करत बसलो आहे

 नुसतं टाईमपास करत बसलो आहे
तासांपासून वाट बघत बसलो आहे
 
आठवते का तू जो शब्द दिला होतास
आठवून तो परत परत बसलो आहे
 
तू येणारच नव्हती, नाही आली तू
बघ, रडण्याऐवजी हसत बसलो आहे
 
प्रणयावरती विरहाने हल्ला केलं
आठवणींच्या दरीत कण्हत बसलो आहे
 
रात्री आहे गडद लोक भटकू शकतात
म्हणून ह्या रस्त्यात जळत बसलो आहे

No comments:

Post a Comment